सातारा -पाटण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळी विद्युत रोषणाई करताना वीजेचा शॉल लागून कारखान्यातील कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल अशोक यादव (वय 24, रा. साईकडे, ता. पाटण), असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.
Electric Shock : मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्युत रोषणाई करताना वीजेचा शॉक; कर्मचार्याचा जागीच मृत्यू - वीजेचा शॉक लागून कर्मचार्याचा जागीच मृत्यू
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखाना कार्यस्थळावर विद्युत रोषणाई करताना वीजेचा शॉल लागून कारखान्यातील कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल अशोक यादव (वय 24, रा. साईकडे, ता. पाटण), असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.
विद्युत खांबावर वायर जोडताना लागला शॉक -मंत्री शंभूराज देसाई यांचा गुरूवारी (दि. 17) वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर जंगी तयारी सुरू आहे. मराठी कलाकारांच्या संगीत रजनी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईचे काम सुरू असताना कारखान्यातील कर्मचारी विशाल यादव हा वायर जोडण्यासाठी वीजेच्या खांबावर चढला होता. अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने वीजेचा जबर शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
पालकमंत्र्यांची घटनास्थळी धाव -वीजेच्या धक्क्याने कारखान्यातील कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई हे तातडीने कारखान्यावर दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच मल्हारपेठ पोलीस आणि वीज वितरण कंपनीच्या अधिक़ार्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कर्मचार्याचा मृतदेह वीजेच्या खांबावरून खाली घेण्यात आला. कोणाचीही तक्रार नसल्याने पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह पाटण ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला.