सातारा- पोवई नाक्यावरील नामवंत कापड व्यावसायिक सुशांत बाळकृष्ण नावंधर यांच्या मालकीच्या नवरंग या कापड दुकानामधून कामगारानेच १५ लाखांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. आहे. याप्रकरणी कामगार साहिल हाकिम याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत नावंधर यांच्या सिल्क पॅलेस, नवरंग साडी एम्पोरियम, नवरंग वस्त्रमहाल, नवरंग आणि नवरंग कलेक्शन अशा पाच दुकाने नाक्यावर आहेत. या पाचही दुकानातील सर्व कॅश कलेक्शन एकाच काऊंटरवर करणयात येते. येथे चाळीस कामगार कार्यरत आहे. २८ सप्टेंबर (मंगळवार) नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता विलास नावंधर यांनी दुकान उघडले आणि दुकानाच्या ड्राव्हरमधील पैसे ते मोजत असताना ते कमी असल्याचे आढळून आले.