सातारा -खंडाळा तालुक्यातील भादे येथील तळे शिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ज्योती कृष्णात चव्हाण (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या असताना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडून त्या जागीच ठार झाल्या आहेत.
खंडाळा तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू - death due to lightning strike in khandala satara
ज्योती कृष्णात चव्हाण (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या असताना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडुन त्या जागीच ठार झाल्या आहेत.
हेही वाचा -अंगावर वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, नांदळज बौद्धवाडीतील घटना
कृष्णात चव्हाण यांची भादे गावच्या हद्दीतील तळे शिवारात शेती आहे. त्यांच्या पत्नी ज्योती या शेतामध्ये नेलेली जनावरे आणण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर वीज पडली. या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. पण, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मृतदेहाचे विच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आला आहे.