महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडच्या वाखान परिसरात महिलेचा निर्घृण खून, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही तपासणार - महिलेचा खून बातमी

कराडमधील कोष्टी गल्ली हे उज्ज्वला ठाणेकर यांचे सासर असल्याची माहिती समोर येत आहे. पतीपासून त्या विभक्त राहत होत्या. सध्या त्या कृष्णा नाक्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.

सातारा खून
सातारा खून

By

Published : Sep 25, 2021, 3:54 PM IST

Updated : Sep 25, 2021, 5:09 PM IST

कराड (सातारा) -कराडच्या वाखान परिसरात अज्ञाताने महिलेचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज (शनिवारी) सकाळी समोर आला आहे. उज्ज्वला ठाणेकर (वय 32), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या. भाड्याच्या घरात त्या एकट्या राहत होत्या. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सातारा खून

परिचारिका म्हणून कार्यरत

कराडमधील कोष्टी गल्ली हे उज्ज्वला ठाणेकर यांचे सासर असल्याची माहिती समोर येत आहे. पतीपासून त्या विभक्त राहत होत्या. सध्या त्या कृष्णा नाक्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या तेथे नोकरीला लागल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मृत उज्ज्वलाच्या बहिणीचे पती आज सकाळी तिच्या घरी आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

सीसीटीव्ही तपासणार

महिलेचा गळा चिरून खून झाल्याची माहिती मिळताच कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर हे पोलीस कर्मचार्‍यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वाखान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्याचे काम सुरू आहे.

घटनास्थळी गर्दी

महिलेच्या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत. अद्याप तरी कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती.

Last Updated : Sep 25, 2021, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details