सातारा -जावळी तालुक्यातील ओझरे येथे वनक्षेत्रात वणवा लावल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने सावित्रीबाई दगडू कदम (रा. ओझरे) या महिलेला 3 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
वन क्षेत्रात वणवा लावणाऱ्या महिलेस दंड - Woman punished for setting fire to forest
जावळी तालुक्यातील ओझरे येथील वन क्षेत्रात 25 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझवली. याप्रकरणी भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -साताऱ्यात विवाहितेचा विनयभंग; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
वन विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील ओझरे येथील वन क्षेत्रात 25 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझवली. याप्रकरणी भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा वनवा गावातीलच सावित्रीबाई कदम यांनी लावल्याचे स्पष्ट झाले. वनपाल आर. ए. परधाने आणि वनरक्षक आर. एस. कावळे यांनी संशयितास अटक करून मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 3 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.