सातारा- जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयांतील संशयितांचे रिपोर्ट आले असून 27 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 336 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात सोमवारी आढळले 27 कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू - 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू
सोमवारी दिवसभरात वाई तालुक्यातील दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याने या साथरोगाला बळी पडलेल्यांची जिल्ह्याची संख्या 9 झाली आहे. 27 बाधितांची वाढ झाल्याने उपचार सुरू असलेल्या बाधितांचा आकडा 205 इतका झाला आहे. तसेच 122 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -
महाबळेश्वर तालुका - पाचगणी 2.
जावळी - सायगाव 1, मोरघर 4, सावरी (ग्रामपंचायत कसबे बामणोली) 1.
वाई - परतवाडी 3, दह्याट 4, अकोशी 1, धावडी 2, जांभळी येथील 1 (मृत्यू).
खंडाळा - आंधोरी 1.
सातारा- रायघर 1, शेळकेवाडी 2.
खटाव - डांबेवाडी 1.
कराड - म्हासोली 1.
पाटण - खळे 1 व काळेवाडी (आडूळ) 1.