महाराष्ट्र

maharashtra

Wireman died due to shock : वीज पुरवठा दुरुस्ती करताना खांबावरच शॉक लागून वायरमनचा मृत्यू

By

Published : Aug 5, 2022, 1:11 PM IST

Updated : Aug 5, 2022, 2:00 PM IST

आष्टा येथे विजेचा शॉक लागून खांबावरच एका वायरमनचा ( Wireman died due to shock on the pole ) मृत्यू झाला आहे. मृत्यू नंतर मृतदेह खांबावर ( Wireman died in aashta sangli ) लटकत होता. अजित बनसोडे, असे या कर्मचाऱ्याचेनाव आहे.

Wireman died due to shock on the pole
वायरमनचा मृत्यू सांगली

सांगली - आष्टा येथे विजेचा शॉक लागून खांबावरच एका वायरमनचा ( Wireman died due to shock on the pole ) मृत्यू झाला आहे. मृत्यू नंतर मृतदेह खांबावर ( Wireman died in aashta sangli ) लटकत होता. अजित बनसोडे, असे या कर्मचाऱ्याचेनाव आहे. वीज दुरुस्ती कामासाठी विद्युत पोलवर चढले असता ही दुर्घटना घडली.

वायरमनचा मृत्यू

हेही वाचा -Prithiviraj Chavan : शिवसेना कोणाची?, सर्वोच्च न्यायालयाची तारीख-पे-तारीख; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी, म्हणाले...

आष्टा येथील इस्लामपूर रोडवर वीज वितरण कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एसटी स्टँड चौकात लाईटच्या पोलवरती काम करीत असताना ही घटना घडली. आष्टा महावितरण कार्यालयात भडकंबे येथील वाळवा येथील अजित मुकुंद बनसोडे वय (वय 32) हे वायरमन म्हणून काम करत होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास वीज पुरवठा नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी अजित बनसोडे विजेच्या खांबावर चढले होते. यावेळी दुरुस्ती सुरू असताना अचानकपणे बनसोडे यांना विजेचा जोरदार शॉक लागला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. बनसोडे यांचा मृतदेह विजेच्या खांबावरच लटकत होता. या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळानंतर महावितरणचे कर्मचारी आणि पोलिसांनी बनसोडे यांचा विद्युत खांबावर लटकत असलेला मृत्यूदेह खाली उतरवला.

आष्टा वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अजित बनसोडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आष्टा वीज वितरण कार्यालयाच्या दारात नेऊन संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अजित बनसोडे यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा एक मुलगा व दोन महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे भडकंबे व आष्टा येथे हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा -Anil Babar Wife Passed Away: शिवसेना आमदार अनिल बाबर यांना पत्नीशोक; काही दिवसांपासून होत्या आजारी

Last Updated : Aug 5, 2022, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details