सातारा - जिल्ह्याच्या पश्चिमेकडील परळी खोऱ्यात ( Parli valley in Satara ) सावली (ता. सातारा) गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार ( Wild Boar Hunting ) करुन मांस विक्री करणाऱ्या १६ जणांना ( Crime in case of wild boar hunting ) वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मांस ताब्यात घेऊन वन्यप्राणी शिकार प्रकरणी ( case of wild boar poaching ) संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wild Boar Hunting : रानडुक्कराची शिकार केल्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल - Satara Forest Department
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील परळी खोऱ्यातील ( Parli valley in Satara ) सावली (ता. सातारा) गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार ( Wild Boar Hunting ) करुन मांस विक्री करणाऱ्या १६ जणांना ( case of wild boar poaching ) वनविभागाच्या पथकाने ( Satara Forest Department ) रंगेहाथ पकडले. मांस ताब्यात घेऊन वन्यप्राणी शिकार प्रकरणी गुन्हा ( Crime in case of wild boar hunting ) दाखल करण्यात आला आहे.
मांस विक्री करताना रंगेहाथ सापडले -सावली गावच्या हद्दीत रानड्क्कराची शिकार करुन मासांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती सातारा वनविभागाला ( Satara Forest Department ) मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन छापा टाकण्यात आला. या प्रकरणी सावली गावातील साजन साळुंखे, शंकर भिलारे, वंदना बादापुरे, जनार्दन साळुंखे, भाऊ साळुंखे, बळीराम साळुंखे, लिलाबाई साळुंखे, हणमंत साळुखे, लक्ष्मण साळुंखे, नथुराम साळुंखे, विष्णु कृष्णा साळुंखे, रामचंद्र साळुंखे, सिद्ध साळुंखे, यशोदा साळुंखे, विष्णू रामचंद्र साळुंखे, किशोर साळुंखे अशा एकुण १६ जणांना मांस विक्री करताना रंगेहाथ वनविभागाने पकडले आहे.
गावठी श्वान, काठ्यांच्या साहाय्याने शिकार -सावली गावच्या हद्दीत गावठी श्वान, काठ्यांच्या सहाय्याने शिकार होत असल्याची बाब समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी आणखी कोणत्या वन्य प्राण्यांची शिकार केली आहे का, याचाही तपास वनविभाग करणार आहे. रानडुक्कराच्या शिकार प्रकरणी नोंद केलेल्या गुन्ह्याचा तपास वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनिल शेलार, साधना राठोड करत आहेत.