सातारा -साताऱ्यात एसटी ड्रायवरच्या ( ST Bus Driver ) तप्तरतेमुळे मोठा अपघात होण्यापासून टळला. चालकाला अचानक चक्कर आल्याने तो स्टेअरिंगवर ( Bus steering ) कोसळणार इतक्यात त्याने एसटी ऊसाच्या शेतात घातली. त्यामुळे मोठा अपघात होण्यापासून राहिला. एसटी प्रवाशांचे प्राण वाचले. भुईंजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एसटी चालकावर उपचार सुरु आहेत.
एसटी ऊसाच्या शेतात घातली -एसटी चालवताना ड्रायव्हरला अचानक चक्कर आल्याने तो स्टेअरिंगवर कोसळणार इतक्यात स्वतः:ला सावरत ड्रायव्हरने बस सर्व्हिस रोडकडेच्या ऊसाच्या शेतात ( Sugarcane field ) घातली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि बसमधील ४० प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पुणे-बंगळुरू महामार्गावर ( Pune-Bangalore highway ) भुईंजनजीक सोमवारी ही घटना घडली. चक्कर येऊन उलटी झालेल्या बसचालक प्रदीप प्रमोद माताडे (रा. तासगाव, जि. सांगली) यांच्यावर भुईंजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Bhuinj Primary Health Center )उपचार सुरु आहे.
एसटी ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाचे कौतुक -बसचालक प्रदीप प्रमोद माताडे हे सोमवारी पुणे-तासगाव एसटीवर चालक होते. भुईंज येथे आल्यानंतर बसस्थानकात नेण्यासाठी त्यांनी एसटी बस महामार्गावरून सर्व्हिस रोडवर घेतली. बसस्थानकाकडे जात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि उलटी झाली. चक्कर आल्याने ते स्टेअरिंगवर कोसळणार इतक्यात त्यांनी स्वतःला सावरत बस रस्त्याच्या बाजूच्या उसाच्या शेतात घातली. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
भुईंज पोलीस आणि ग्रामस्थ मदतीला धावले -एसटी बस रस्त्यावरून अचानक खाली गेल्यामुळे प्रवाशी घाबरले. त्यानंतर बस उसाच्या शेतात जाऊन थांबल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. चक्कर येऊन देखील चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अपघात टळला. घटनेची माहिती मिळताच भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक रत्नदीप भांडारे, हवालदार चंद्रकांत मुंगसे, बापूराव धायगुडे, राजेश कांबळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत एसटीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
हेही वाचा -Kargil Vijay Diwas 2022 : कारगिल युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला कसे तोंडघशी पाडले, जाणून घ्या...