सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे साताऱ्यातील शेतकऱ्याचे शेकडो हेक्टर क्षेत्रातील खरबूज, कलिंगडचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचा नुकसान होऊन खर्चसुद्धा यातून निघाला नाही, असे शेतकरी बोलून दाखवत आहेत.
मार्केट बंद टरबूज-कलिंगड दर ढासळले, खर्चदेखील निघेना - मालाला भाव नाही
लॉकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. याचा मोठा फटका कलिंगड आणि टरबूजच्या शेतकऱ्यांना बसलाय. अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड मोफत वाटायला सुरुवात केलीय तर काहीजण पडलेल्या भावात विकत आहेत.
![मार्केट बंद टरबूज-कलिंगड दर ढासळले, खर्चदेखील निघेना watermelon-prices-fell-](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7212316-thumbnail-3x2-mum.jpg)
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबदी जाहीर झाली आणि बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतमालाचे दर ढासळले गेले. लॉकडाऊनच्या अगोदर 12 ते 15 रुपये किलो दराने जाणाऱ्या कलिंगडास सध्याच्या स्थितीत 5 ते 7 रुपये दर व्यापारी मागू लागले. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. काही शेतकरी शेतात लागवड केलेले कलिंगड मोफत वाटप करत आहेत. संचारबंदीच्या अगोदर हेच कलिंगड व खरबूज बाजारात 10 ते 15 रुपये किलोने जात होते. लॉक डाऊन सुरू झाले आणी बाजार बंद, त्यामुळे दर कोसळले. कमी दरात व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा शेतातील कलिंगड रस्त्याबाजूला बसून विकत आहेत. तर काही जण मोफत वाटून टाकत आहेत.