महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाचा जोर वाढला; गेल्या 24 तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 6 टीएमसीने वाढ - कोयना धरण पाणीसाठा

आज सकाळी 8 वाजेपर्यंत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 247, नवजा येथे 300, महाबळेश्वर येथे 304 आणि वाळवण येथे 239 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Water level increase in koyana dam
Water level increase in koyana dam

By

Published : Aug 5, 2020, 12:55 PM IST

कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 6 टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 60.28 टीएमसी झाला आहे.

आज सकाळी 8 वाजेपर्यंत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 247, नवजा येथे 300, महाबळेश्वर येथे 304 आणि वाळवण येथे 239 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांतील पाण्याची आवक 58 हजार 830 क्युसेक होती. परंतु, मागील एका तासात ती 1 लाख 18 हजार 692 क्युसेक इतकी झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी -

धोम- 5.51 (47.13), धोम-बलकवडी- 2.46 (62.25), कण्हेर- 5.06 (52.73), उरमोडी- 6.74 (69.83), तारळी- 3.05 (52.20), निरा-देवघर 3.06 (26.13), भाटघर- 9.86(41.95), वीर – 3.72. (68.39).

ABOUT THE AUTHOR

...view details