सातारा (कराड)- कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी एवढी आहे. सध्या धरणात 100.16 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यातील 95.16 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. 5 टीएमसी पाणीसाठा हा मृत समजला जातो.
कोयना धरणातील पाणीसाठा 100 टीएमसी पार, तीन महिन्यांत 5 हजार मिलीमीट पाऊस 103 दिवसात 5 हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस
कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तीन प्रमुख पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 सप्टेंबर या 103 दिवसांच्या कालावधीत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 3 हजार 896 मिलीमीटर, नवजा येथे 5 हजार 154, महाबळेश्वर येथे 5 हजार 157, जोर येथे 6 हजार 520 आणि वळवण येथे 5 हजार 914 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
42 टीएमसी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग
कोयना धरण क्षेत्रात जुलै-ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली. पाण्याची आवक प्रचंड होती. त्यामुळे धरणाी पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून तसेच पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडावा लागला. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून 35.56 टीएमसी पाणी विनावापर तर पायथा वीजगृहातून 7 टीएमसी असे एकूण 42.56 टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 10 टीएमसी पाण्याची गरज
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी एवढी आहे. सध्या धरणात 100.16 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यातील 95.16 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. 5 टीएमसी पाणीसाठा हा मृत समजला जातो. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 10 टीएमसीची गरज आहे. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचा पायथा वीजगृह बंद करण्यात आला होता. तेव्हापासून धरणातील पाण्याचा विसर्ग बंद आहे.