महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जलपातळीने केला सांडवा माथा पार; कोयना धरणात ७३.५५ टीएमसी पाणीसाठा - Satara flood situation

पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. रविवारी पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात प्रतिसेकंद १३ हजार ७३० क्यूसेक या वेगाने सुरू असल्याने सायंकाळी पाचपर्यंत धरणात ७३.५५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

Koyana dam water updates
Koyana dam water updates

By

Published : Aug 10, 2020, 8:51 AM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक ही कमी झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा ७३.५५ टीएमसीवर पोहोचला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत चालला आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. रविवारी पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात प्रतिसेकंद १३ हजार ७३० क्यूसेक या वेगाने सुरू असल्याने सायंकाळी पाचपर्यंत धरणात ७३.५५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

धरणातील सध्याची जलपातळी ही धरणाच्या सहा वक्रद्वार म्हणजेच सांडवा माथा पार करून पुढे सरकली आहे. या जलपातळीने निर्धारित पातळीही पार केली आहे. मात्र, धरण परिचालन सूचीनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी सध्यातरी पाणलोट क्षेत्रात पावसाचा म्हणावा तसा जोर नाही. परिणामी, पाण्याची आवकही त्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची सध्यातरी शक्यता नाही. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग सुरू करून पाणीपातळी नियंत्रित करावी लागेल, अशी माहिती कोयना जलसिंचन विभागाने दिली.

दरम्यान, रविवारी सकाळी आठवाजेपर्यंत २४ तासांत कोयनानगर येथे ४४ (२७०५)मिलिमीटर,नवजा २५(२९५९) मिलिमीटर,महाबळेश्वर ४८ (२८९६) आणि वाळवण ३३ (३५७०)मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details