महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवशाहीने प्रवास करा अन् पावसावाचा अनुभव घ्या! - Jayajyoti Pednekar

राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचा प्रवास सुखद प्रवास, अशी घोषणा करण्यात येते. प्रवाशांचा प्रवास सुखद आणि आरामदायी व्हावा यासाठी एस.टी.कडून विविध प्रकारच्या बसगाड्या चालविल्या जातात. त्यापैकी एक असलेली शिवशाहीची खूप चर्चा असते. यंदा मात्र, या शिवशाहीची वेगळीच चर्चा होत आहे. ते म्हणजे गळक्या शिवशाहीची.

शिवशाही बसमध्ये पावसाचे पाणी गळताना

By

Published : Jul 6, 2019, 6:03 PM IST

मुंबई - पावसाळ्यात रस्त्यावर गळक्या बस दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना गळक्या बसमधून फिरवणार, अशी ताकीद परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली होती. तरीही नुकतीच अत्याधुनिक शिवशाही बसमध्ये गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरामदायी प्रवास करण्यासाठी जास्त पैसे मोजूनही प्रवाशांना शिवशाही पावसाचा अनुभव घ्यायला मिळाला. यामुळे ऐन पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शिवशाही बसमध्ये पावसाचे पाणी गळताना


सातारा आगारात या गळक्या शिवशाही उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे सातारा-मुंबई फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सातारा-मुंबई मार्गावर २२ फेऱ्यांपैकी ७ फेऱ्या सुरू आहेत. याबाबत राज्य परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांच्याकडे विचारणा केली असता, एखाद्या गाडीत गळती होत असेल मात्र इतर सेवा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details