सातारा(कराड) - पाटण तालुक्यात ढेबेवाडी खोर्यात असलेल्या महिंद धरणाच्या भिंती जवळ मोठे भगदाड पडल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भगदाडामुळे ये-जा करणार्या नागरिकांसह जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
महिंद धरणातील पाणीसाठा सध्या कमी झालेला आहे. त्यामुळे हे भगदाड निदर्शनास आले. यामुळे या परिसरातून ये-जा करणारे पादचारी, जनावरे तसेच पोहायला जाणार्या तरूणांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पाय घसरून या भगदाडात पडल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी महिंद परिसरातील नागरिकांनी केली आहे.