सातारा - वाईच्या रविवार पेठेत तीन पानी जुगार सुरू असल्याची बातमी मिळाल्यानंतर वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत 62 हजार 290 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये एक चोरीचा गुन्हा देखील उघड झाला आहे.
किशोर रोकडे, अविनाश सकटे (दोघे रा. रविवार पेठ, वाई), उत्तम चव्हाण, भीमराव तळधीरे (दोघे रा. सुरूर, ता. वाई), दिलीप मोरे (रा. गंगापुरी, वाई) व निखिल जाधव (रा.सिद्धनाथवाडी ता.वाई) अशी नावे आहेत
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, वाई पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना बातमीदारामार्फत, रविवारपेठेत एक व्यक्ती त्याच्या रहात्या घरात जुगार अड्डा चालत असून त्या ठिकाणी तीन पत्ती नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन रविवारपेठेत पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी 6 लोक टेबल-खुर्च्यांवर बसून तीनपत्ती नवाचा जुगार पैसे लावून खेळत असताना मिळाले. संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, असा एकूण 62 हजार 290 रुपयांचा माल जप्त केला आहे. या ठिकाणी जुगार खेळणारे इसम व घरमालक यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय शिर्के हे करीत आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी कोयनानगर दौऱ्यावर
हेही वाचा -'सुपर ६०' नंतर काँग्रेसची 'सुपर १०००' मोहीम; आगामी निवडणुकांमध्ये तरुण-तरुणींना देणार उमेदवारी