महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुक मैत्रिणीचे अश्लील छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी एकाला अटक - Wai viral obscene images news

समाज माध्यमांच्या मदतीने आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी मैत्री करू शकतो. मात्र, ही मैत्री कधी-कधी धोकादायकही ठरू शकते. साताऱ्यातील वाईमध्ये अशीच एक घटना घडली आहे.

Cyber Crime
सायबर क्राईम

By

Published : Dec 5, 2020, 12:42 PM IST

सातारा - फेसबुकवरील एका ३५ वर्षीय मैत्रिणीचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकाला अटक केले आहे. सागर तुकाराम सोनवलकर (रा. वडले, ता. फलटण) असे आरोपीचे नाव आहे.

अश्लील फोटोची केली मागणी -

पिडीत महिला वाई तालुक्यात आपल्या कुटुंबासह राहते. आठ महिन्यांपूर्वी फेसबुकवर सागर सोनवलकर याच्याशी तिची मैत्री झाली. त्यातून दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्याने महिलेला व्हिडिओ कॉल करण्यास सांगून त्यांचे काही फोटोही काढले. त्यानंतर त्याने त्यांच्याकडे अश्लील फोटोची मागणी केली होती.

रागातून केले छायाचित्र व्हायरल -
त्याच्याकडून अश्लील फोटोंची वारंवार मागणी झाल्याने महिलेने त्याला ब्लॉक केले. या गोष्टीचा राग मनात धरून सोनवलकर याने महिलेची अश्लील छायाचित्र पिडीतेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर व समाज माध्यमावर प्रसारित करून त्यांची बदनामी केली. संबंधित महिलेची बदनामी करून तिच्या मुलींचे लग्न होऊन देणार नाही अशी धमकीही दिली.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या -
सोनवलकर याच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details