महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 11, 2022, 9:33 PM IST

ETV Bharat / state

Satara Crime: अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाची दगडाने ठेचून हत्या, १२ तासात संशयिताला अटक

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाचा खून झाल्याची ( Wadap businessman Murder ) घटना घडली होती. घटनेच्या 12 तासात या खूनप्रकरणातील संशयित आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश ( suspect arrested within 12 hours ) आले आहे. जंगलात पोलिसांनी सुमारे ७ कि. मी. चालत जाऊन शोध घेत झाडावर लपून बसलेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास मल्हारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

सातारा: पाटण तालुक्यातील वडाप व्यावसायिकाच्या खुनाचा ( Wadap businessman Murder ) १२ तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश ( suspect arrested within 12 hours ) आले आहे. जंगलात लपून बसलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. नारायण तुकाराम मोंडे (रा. भैरेवाडी, ता. पाटण), असे संशयिताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून संशयिताने गावातीलच सिताराम बबन देसाई यांची दगडाने ठेचून हत्या केली होती.

संशयिताला अटक करणाऱ्या पोलीस पथकासोबत पोलीस अधीक्षक समीर शेख


जनावरांच्या गोठ्यात आढळला मृतदेह:भैरेवाडी गावातील मळी नावाच्या शिवारात जनावरांच्या शेडमध्ये सिताराम बबन देसाई यांचा मृतदेह आढळला. दगड, विट व काठीने मारहाण करुन त्यांचा खून करण्यात आला होता. पत्नी संगिता देसाई यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेमागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याचे समोर आले. त्यामुळे संशयिताचे नाव निष्पन्न झाले.

मृत सिताराम देसाई

जंगलात संशयित आरोपीचा शोध: तपास पथकातील मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, संतोष तासगावकर, उपनिरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, राजकुमार ननावरे, मोहन नाचण, स्वप्निल माने, शिवाजी गुरव, मयूर देशमुख हे गणेवाडीच्या जंगलात सुमारे ७ कि. मी. चालत गेले. झाडावर लपून बसलेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास मल्हारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details