महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील नवले गावात नवलाई, घड्याळासमोरील बटन दाबले की मत कमळाला ! - कोरेगाव मतदारसंघ

काल (सोमवार) सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपच्या उमेदवाराला मत गेल्याचे दिसून आले. यामुळे मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाला.

संपादित छायाचित्र

By

Published : Oct 22, 2019, 1:52 PM IST

सातारा - काल (सोमवार) सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत गेल्याचे दिसून आले. हा प्रकार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील नवले गावी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. मतदारांना ही बाब लक्षात येताच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर आणून दिला. काही वेळानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले व पुन्हा मतदान सुरू करण्यात आले.

सकाळी हा प्रकार होत असताना ११ वाजेपर्यंत येथील ईव्हीएम बदलण्यात आले. तोपर्यंत सुमारे २९० मतदारांनी मतदान केल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे नंतर वारंवार याबाबत मतदारांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर संबंधीत मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचे त्यांनी पाहणी करून सांगितले. काही वेळातच ईव्हीएम बदलण्यात आलं पुन्हा मतदान पार पडले.

ABOUT THE AUTHOR

...view details