सातारा - जिल्ह्यातील मलकापुरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तोंडाला मास्क नसल्यास 500 रुपये, होम क्वारंटाईनचे उल्लंघन केल्यास, तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 1 हजार रुपये दंड केला जाणार असल्याची माहिती मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी दिली.
मलकापुरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना होणार दंड
सातारा जिल्ह्यातील मलकापुरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना होणार दंड
नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर गेल्यानंतर सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी व घराबाहेर व जेथे लोकांचा वावर आहे, तेथे चेहर्यावर मास्क वापरणे बंधनकारक आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षाखालील मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मलकापूर शहरातील नागरिक व दुकानदारांनी अटी व नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी सांगितले.