महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ते चव्हाण कुठे आणि हे चव्हाण कुठे? उंडाळकरांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी महाराष्ट्राची घडी बसवताना बहुजन समाजातील सर्वसामान्यांना सत्तेत आणले. तो पुरोगामी महाराष्ट्र आज कुठे आहे? असा सवाल माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकरांनी केला.

उंडाळकरांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

By

Published : Oct 17, 2019, 1:26 PM IST

सातारा - यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी महाराष्ट्राची घडी बसवताना बहुजन समाजातील सर्वसामान्यांना सत्तेत आणले. तो पुरोगामी महाराष्ट्र आज कुठे आहे? असा सवाल माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकरांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळेच ही वेळ आल्याचे सांगत ते चव्हाण कुठे आणि हे चव्हाण कुठे, असा टोलाही उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला.


यशवंतराव चव्हाणसाहेबांनी पुरोगामी महाराष्ट्राची घडी बसवताना बहुजन समाजातील सर्वसामान्यांना सत्तेत आणले. तो पुरोगामी महाराष्ट्र आज कुठे आहे? असा सवाल माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकरांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळेच ही वेळ आल्याचे सांगत ते चव्हाण कुठे आणि हे चव्हाण कुठे, असा टोलाही उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाणांना मारला.

हेही वाचा - 'भाजपनेही अनेक ठिकाणी युतीधर्म नाही पाळला'

हेही वाचा - नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील कार्वे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. उदयसिंह पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव थोरात, माजी पंचायत समिती सदस्य वैभव थोरात उपस्थित होते.

कराड दक्षिणमधील दोन्ही पक्षांचे उमेदवार यशवंतराव चव्हाण यांचा विचार आणि संस्कृती न मानणारे आहेत. त्यामुळे कराड दक्षिणची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार असल्याचे उंडाळकर म्हणाले. पुरोगामी विचारांचा वारसा असणार्‍या अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना जनतेने साथ द्यावी. आज देशातील संसदीय लोकशाही धोक्यात आहे. त्याचा थेट परिणाम प्रत्येक माणसाच्या जीवनावर झाला आहे. निवडणुकीत येणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे. त्याच पैशातून दारू, ढाबा संस्कृतीला खतपाणी घालून लोकशाही संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. म्हणून जनतेने मतपेटीद्वारे वैचारिक बंडखोरी करून यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र वाचवला पाहीजे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना कराड दक्षिणच्या जनतेने नाकारल्याने आम्ही रयत संघटनेच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा केला असून जनतेने त्यास पाठिंबा द्यावा, असे उंडाळकर म्हणाले.


अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, की आपला संघर्ष वैचारीक आहे. मागील निवडणुकीत ज्यांना निवडून दिले, त्यांनी केलेल्या विकासाचा लेखाजोखा जनतेने विचारात घ्यावा. 1980 पर्यंत कराड दक्षिण विकासापासून कोसो दूर का होता आणि विलासकाका आमदार झाल्यानंतर मतदार संघाचा चेहरामोहरा कसा पालटला, याचे कृष्णाकाठच्या जनतेने अवलोकन केले पाहिजे. कृष्णाकाठच्या पुढार्‍यांनी ऊस बिलाच्या कपातीतून संपत्ती निर्माण केली. त्या संपत्तीच्या जोरावर जनतेला नाचवण्याचे काम सुरू आहे. पैशाचा आणि संस्थांमधील कर्मचार्‍यांचा वापर लोकशाहीत कदापी मान्य होणार नाही. विलासकाकांच्या विकासकामांचा रथ पुढे नेण्यासाठी मी कायमच समाजाबरोबर राहिलो असल्याचे पाटील म्हणाले.

वाकुर्डे योजनेचे पाणी कराड तालुक्यात आले, तर राजकीय संन्यास घेऊ, असे वक्तव्य कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहितेंनी १० वर्षापूर्वी केले होते. त्याची आठवण करून देत मदनराव मोहिते आपण प्रत्येक निवडणुकीत या व्यासपीठावरून त्या व्यासपीठावर कशासाठी उड्या मारताय, असा खोचक सवाल विलासकाकांच्या समर्थकांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details