सातारा- जिल्ह्यातील दुष्काळी भागात जनावरांच्या चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या. मात्र, आता शेळ्या मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न शेतकरी व मेंढपाळांना समोर उभा राहिला आहे. यावरती जलसंपदा मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रस्ताव आल्यास चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी मंजूर करणार असल्याचे सांगितले.
चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करणार - पालकमंत्री विजय शिवतारे
जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न शेतकरी व मेंढपाळांना समोर उभा राहिला आहे. यावरती जलसंपदा मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रस्ताव आल्यास चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी मंजूर करणार असल्याचे सांगितले.
तसेच शेळ्या मेढ्यांना लागणारे कडवळ, ओला चारा या सर्व बाबींचा विचार करून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या प्रस्तावाची माहिती घेतली जाईल. त्यानंतर चारा छावण्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे.
शासनाच्या परिपत्ररानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची 'फी' माफी करण्यात आली आहे. मात्र, या संदर्भात विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालय कोणतीही भूमिका घेत नाही. यासंदर्भात बोलताना शिवतारे यांनी सांगितले की शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून यावरती चर्चा करणार आहे. तसेच ज्या मुलांनी आधीच जास्त फी आहे त्यांची 'फी' माघारी देण्यासाठी प्रयत्न करू असे शिवतारे यांनी सांगितले.