कराड (सातारा) - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे विवाहासाठी गेलेल्या पाटण तालुक्यातील विहे गावातील 85 जणांपैकी 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील 72 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामुळे विहेगाव आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि ग्राम दक्षता समितीने घेतला आहे.
पाटण तालुक्यात उडाली खळबळ-
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे लग्नासाठी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी विहे गावातून दोन ट्रॅव्हल्स गेल्या होत्या. दोन्ही ट्रॅव्हल्समधून 80 ते 85 लोक प्रवास करत होते. लग्न समारंभ उरकून गावी आल्यानंतर एकाला 3 आणि 4 मार्च रोजी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या इतरांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्यातील तब्बल 13 जण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली.
तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी विहे गावाला दिली भेट-