सातारा- बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराड येथील त्रिशक्ती फाऊंडेशनच्या वतीने सलग 21 वर्षापासून विजय दिवस सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा या सोहळ्याचे 22 वे वर्ष असून सोमवारी दुपारी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मुख्य सोहळ्यात थरारक प्रात्यक्षिके कराडकरांना अनुभवायास मिळणार आहेत. विजय दिवस सोहळा 3 दिवस चालतो. शनिवारी शोभायात्रेने या सोहळ्यास प्रारंभ झाला होता.
हेही वाचा - कराड-चिपळूण मार्गावर एसटी-मोटरसायकल अपघात, एक ठार
कराड तालुक्यातील शेणोली गावचे सुपूत्र आणि निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकारासह सैन्य दलाच्या सहकार्याने गेल्या 21 वर्षापासून कराडात विजय दिवस सोहळा साजरा होत आहे. 1971 च्या बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. त्या विजयाप्रित्यर्थ देशात मोजक्या ठिकाणी विजय दिवस सोहळा साजरा करण्यात येतो. त्यामध्ये कराडचाही समावेश आहे. या सोहळ्यामुळे कराडचा देशपातळीवर लौकीक झाला आहे.