महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात व्यापाऱ्यांच्या मूक आंदोलनाला वेदांतिकाराजे यांचा पाठिंबा; लाॅकडाऊनचा केला विरोध - Satara lockdown traders protest

साताऱ्यात लाॅकडाऊन विरोधात कर्तव्य साेशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी रस्त्यावर उतरत व्यापाऱ्यांच्या मूक आंदोलनाला पाठिंबा दिला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हा लाॅकडाऊन केला आहे. त्याविरोधात आज व्यापऱ्यांकडून आंदोलन झाले.

Satara lockdown traders protest
वेदांतिकाराजे भोसले लॉकडाऊन विरोध

By

Published : Jul 6, 2021, 10:05 PM IST

सातारा - साताऱ्यात लाॅकडाऊन विरोधात कर्तव्य साेशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी रस्त्यावर उतरत व्यापाऱ्यांच्या मूक आंदोलनाला पाठिंबा दिला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हा लाॅकडाऊन केला आहे. त्याविरोधात आज व्यापऱ्यांकडून आंदोलन झाले.

प्रतिक्रिया देताना कर्तव्य साेशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले

हेही वाचा -साताऱ्यात प्रशासनाने लावलेली टाळेबंदी अन्यायकारक; निर्बंध शिथिल करण्याची शिवेंद्रसिंहराजेंची मागणी

प्रशासनाने तातडीने लाॅकडाऊन हटवावे

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व गोष्टी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयास जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह सातारा शहरातील व्यापारी वर्गाने कडकडून विरोध दर्शविला. आज (मंगळवार) व्यापाऱ्यांच्या मूक आंदाेलनात कर्तव्य साेशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भाेसले यांनी सहभाग घेतला. सरसकट बंद ठेवणे याेग्य नाही. मंडई, बॅंका, माध्यमांची कार्यालये, शासकीय कार्यालये चालू आहेत. तेथे काेविड हाेत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करू नका. प्रशासनाने तातडीने लाॅकडाऊन हटवावे, अशी मागणी वेदांतिकाराजेंनी केली.

आंदोलक कुटुंबीयांसह रस्त्यावर

सातारा शहरातील व्यापारी पोवई नाका ते राजवाडा परिसरात आपल्या कुटुंबांसह रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाच्या हातात फलक होते. या फलकांवर व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा लिहिल्या हाेत्या. राजवाडा, पाेवई नाका येथे आंदाेलक आपापल्या दुकानांच्या बाहेर कुटुंबासह हातात मागण्यांचे फलक घेऊन उभे हाेते. वेदांतिकाराजे भाेसले यांनी स्वतः हातात फलक घेऊन लाॅकडाऊन हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

युपी-गुजरातमध्ये लाॅकडाऊन नाही

वेदांतिकाराजे भाेसले म्हणाल्या, उत्तरप्रदेश, गुजरात येथे लाेकसंख्या माेठ्या संख्येने आहे. तेथे पण काेराेनाचा प्रादुर्भाव झाला, परंतु लाॅकडाऊनचे प्रमाण अल्प प्रमाणात हाेते. आपल्याकडे दाेन-तीन महिने लाॅकडाऊन केले जात आहे. यामुळे लाेकांनी जगायचे कसे? हा प्रश्न उपस्थित हाेत आहे. पैसे नसल्याने लाेक हतबल हाेऊ लागले आहेत. आत्महत्या वाढू लागल्या आहेत. सर्व व्यापाऱ्यांसमवेत हातगाडीधारक देखील रस्त्यावर आलेत.

निवडणुकीवेळी प्रशासन कुठे होते?

कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक झाली, त्यावेळेस सभा झाल्या. तेव्हा काेविड नव्हता का? काेराेनाच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणूक झाली तेव्हा प्रशासन काय करीत हाेते. मंडईत किती गर्दी हाेत आहे, हे एकदा पहा. नियमांच्या अधीन राहून व्यापारी वर्गास परवानगी द्यावी, अशी मागणी वेदांतिकाराजे भाेसले यांनी केली.

कामगारांचे कुटुंब कसे चालणार?

पाेवई नाका व्यापारी संघाचे सुशांत नावंधर म्हणाले, अत्यावश्यक सेवा सुरू असूनही रस्त्यांवर गर्दी हाेत आहे, हे आपण पाहत आहाेत. जिल्हाधिकारी यांनी लाॅकडाबन शिथिल करावे. सर्व व्यवसाय नऊ ते दाेन या वेळेत सुरू ठेवावे. आम्हाला आमचे कुटंब चालवायचे आहे. आमच्या कुटुंबाबराेबरच आमच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे कुटुंब चालवायचे आहे. पालकमंत्र्यांसह सर्व लाेकप्रतिनिधींनी मागण्यांचा विचार करावा. काेराेना कमी करण्यासाठी उपाययाेजना आखाव्यात.

हेही वाचा -संभाजी भिडे यांच्यासह 80 धारकर्‍यांवर कराडमध्ये गुन्हा दाखल, शहरात जमवली होती गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details