सातारा- ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदिरात शुक्रवारी सायंकाळी वसुबारस मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी गोशाळेतील या उत्सवाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ब्रह्मचैतन्य महाराज हे गोपालक होते. त्यांना लहानपणापासूनच गाई खूप आवडायच्या. त्यांनी कसायाकडून अनेक गाई सोडवून आणल्या होत्या.
गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात मंगलमय वातावरणात वसुबारस साजरी - गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात वसुबारस साजरी
ब्रह्मचैतन्य महाराज हे गोपालक होते. त्यांना लहानपणापासूनच गाई खूप आवडायच्या. त्यांनी कसायाकडून अनेक गाई सोडवून आणल्या होत्या. महाराजांचा गोपालनाचा वारसा येथील समाधी मंदिर समितीने आजही सुरू ठेवला आहे.
गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात वसुबारस साजरी
महाराजांचा गोपालनाचा वारसा येथील समाधी मंदिर समितीने आजही सुरू ठेवला आहे. वसुबारस मुहूर्तावर समाधी मंदिर परिसरातील गोशाळेत रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. सायंकाळी सातच्या सुमारास समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते गाई आणि वासराची सपत्नीक विधिपूर्वक पूजा करण्यात आली आणि त्यानंतर आरती होऊन हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी गोमातेचे दर्शन घेतले.