सातारा Vasota Fort In Satara: नववर्षाचे वेध (New Year Celebration) आता लागले आहेत. या काळात अनेकांना पर्यटनाला जायला आवडतं. साताऱ्यातील वासोटा किल्ला (Vasota Fort ) हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या वासोटा किल्ल्याची दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी असते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात. नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होऊ नये म्हणून बामणोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे (Vijay Bathe) यांनी तीन दिवस पर्यककांना वासोटा किल्ल्यावर बंदी घातली आहे.
बोटींग क्लबला सक्त सूचना : वासोटा किल्ला हा वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपत्तीला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी पर्यटकांना ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोयना जलाशयातून पर्यटकांची वाहतूक न करण्याची सक्त सूचना बोटिंग क्लबना (Boating Club) देण्यात आली आहे. या काळात वासोटा किल्ला परिसरात बेकायदेशीररीत्या आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.