सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कराड येथील उपसंचालकपदी उत्तम सावंत तर कोल्हापूरच्या क्षेत्र संचालकपदी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. वनसंरक्षक व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोल्हापूर येथील क्षेत्र संचालक एस. एम. गुजर यांची पुणे येथे वन संरक्षक (संशोधन) म्हणून विनंती बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर समाधान चव्हाण यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकपदी उत्तम सावंत, समाधान चव्हाण नवे क्षेत्र संचालक - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कराड येथील उपसंचालकपदी उत्तम सावंत
कराड येथे कार्यालय असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक श्रीमती विनिता व्यास प्रदीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर वन्यजीव व्यवस्थापनामध्ये मोठा अनुभव असलेले अधिकारी उत्तम सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे.
uttam sawant new deputy director of sahyadri tiger project at satara
कराड येथे कार्यालय असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनिता व्यास प्रदीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर वन्यजीव व्यवस्थापनामध्ये मोठा अनुभव असलेले अधिकारी उत्तम सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. सावंत यांनी नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विभागीय वनअधिकारी म्हणून यापुर्वी उत्तम कामगिरी बजावली आहे.