सातारा -खटाव तालुक्यातील वडूजमधील एका संस्थेच्या आश्रम शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केले आहे. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
आश्रम शाळेत विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य; शिक्षकावर गुन्हा दाखल
आरोपी शिक्षक प्रसाद अशोक गलांडे (रा.भवानीनगर वडूज, गोंदवले ता. माण) याने शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला 20 नोव्हेंबरला रात्री दहाच्या वाजण्याच्या सुमारास पोहे आणि सरबत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलाने पोहे आणि सरबत खोलीत आणल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा लावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

हेही वाचा -जिल्ह्यात पावसाने ओढ देताच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव
पीडित विद्यार्थ्याने याची माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर आरोपी शिक्षकाविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.