महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Suicide : नीरा नदीवरील सारोळा पुलावरून नदीत उडी मारुन तरुणाची आत्महत्या - सातारा अज्ञात तरूणाची आत्महत्या प्रकरण

अज्ञात तरूणाने नीरा नदीवरील सारोळा पुलावरून ( jumping into Neera river in satara ) नदीत उडी मारून आत्महत्या केली ( Suicide in satara ) आहे. रेस्क्यू टीमच्या मदतीने तरूणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 6, 2022, 4:14 PM IST

सातारा : अज्ञात तरूणाने नीरा नदीवरील सारोळा पुलावरून ( jumping into Neera river in satara ) नदीत उडी मारून आत्महत्या केली ( Suicide in satara ) आहे. रेस्क्यू टीमच्या मदतीने तरूणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढला - शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी येथे एका अज्ञात तरूणाने रविवारी सकाळी सारोळा पुलावरून नीरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरूणाचा मृतदेह शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच त्याच्या आत्महत्येमागील कारण देखील स्पष्ट झालेले नाही.


सारोळा पूल बनले आत्महत्येचे ठिकाण - शिंदेवाडी येेथील सारोळा पुलावरून अज्ञात तरूणाने आत्महत्या केल्यानंतर सारोळा पूल हा आत्महत्येचा ब्लॅक स्पॉट बनत असल्याची चर्चा शिरवळ परिसरात सुरू झाली आहे. राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी महिन्याभरापुर्वी याच पुलावरून उडी मारून नीरा नदीत आत्महत्या केली होती. तसेच पुण्यातील वास्तुज्ज्ञाचा खून करून त्यांचा मृतदेह पोत्यात बांधून नीरा नदीत टाकला होता. तर आज एका तरूणाने नीरा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या सर्व घटनांमुळे सारोळा पूल आत्महत्येचा स्पॉट बनला असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details