महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : ..तो मै अपनी खुद की भी नही सुनता; कॉलेज जीवनापासून रामराजेंचा पाठिंबा -उदयनराजे - college

मागील वर्षी लोणंद येथील एका कंपनीवरून उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली होती. मात्र, रविवारी सभेदरम्यान दोघांनीही आम्ही एकच आहोत, असे शरद पवारांसमोर बोलून दाखवले.

खासदार उदयनराजे भोसले

By

Published : Mar 25, 2019, 8:23 AM IST

Updated : Mar 25, 2019, 10:43 AM IST

सातारा - काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणित आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी रविवारी कराडमध्ये सभा घेण्यात आली. यावेळी नेहमीप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खास शैलीत धमाकेदार भाषण केले. मला कॉलेज जीवनापासून रामराजे यांचा पाठिंबा आहे. तेव्हापासून मी कोणावरती झालेला अन्याय सहन केलेला नाही आणि यापुढेही सहन करणार नाही. 'एक बार जो मैने कमेंटमेंट कर दी, तो मै अपनी खुद की भी नही सुनता', असा चित्रपटातील संवाद फेकत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली कॉलर उडवली.

खासदार उदयनराजे भोसले


याआधी सभापती रामराजे नाईक निंबाळकर भाषण करताना मी ही उदयनराजे यांचा चाहता असल्याचे म्हटले होते. मला त्यांचे भाषण ऐकायचे आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, असे बोलून रामराजेंनी आपल्या भाषणाची लवकरच सांगता केली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी बोलताना मला कॉलेज जीवनापासून रामराजे यांचा पाठिंबा आहे. याला सत्यजित पाटणकर ही पुराव्याला आहेत, असे उदयनराजे म्हणताच कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

मागील वर्षी लोणंद येथील एका कंपनीवरून उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली होती. मात्र, रविवारीसभेदरम्यान दोघांनीही आम्ही एकच आहोत, असे शरद पवारांसमोर बोलून दाखवले. उदयनराजे चित्रपटातील संवाद फेकत विरोधकांना टोला लगावल्याने उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकवला होता. भाषमानंतरशरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर टाईट केली.


भाषणादरम्यान उदयनराजेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले आहे. आश्वासने देण्याशिवाय गेल्या पाच वर्षात काही दिले नाही. अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. कर्जमाफी करतो, दोन कोटी नोकरी देतो, १५ लाख रुपये खात्यामध्ये टाकतो, ही आश्वासने मोदी सरकारची आहेत. ती कोण पूर्ण करणार आहे. आजपर्यंत एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही. यामुळे जनतेने मत देताना योग्य निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.यावेळी मंचावर खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषेदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे, सत्यजित पाटणकर आदी आघाडीचे नेते उपस्थित होते.

Last Updated : Mar 25, 2019, 10:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details