सातारा :राज्यपाल हटावसाठी त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन न करता दिल्लीत करावे, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला ( Udayanraje should protest in Delhi ) आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यामागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ आहे का? हेही पाहिले पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले ( MLA Shivendraraje Bhosle advice Udayanraje )आहे.
शिवाजी महाराजांबद्दलच वक्तव्याचा निषेध :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला आहे. त्यांना हटवण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली ( Udayanraje demand remove governor ) आहे. परंतू, यामागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ आहे का? हेही पाहिले पाहिजे. राज्यपाल हटावसाठी त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन न करता दिल्लीत करावे, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिला.