सातारा - ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागला. यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली. यातच एका कार्यकर्त्याने भोसले यांना राज्यसभेवर पाठवा या मागणीसाठी गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. निलेश जाधव, असे या चाहत्याचे नाव असून त्याने उदयनराजेंसाठी मंत्रिपदाची देखील मागणी केली आहे.
उदयनराजेंना मंत्री करा, 'रक्ताने पत्र' लिहून अमित शाहांना साकडे - udayanraje bhosale news
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागला. यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली. यातच एका कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीत साताऱ्याच्या रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पारंपरिक खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक हरल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी जोर धरू लागली.
यानंतर जाधव याने अमित शाहांना रक्ताने पत्र लिहून उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे. तसेच त्याने मंत्रिपद देखील मागितले आहे. स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने या प्रकारे मागणी केल्याने साताऱ्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यात राज्यातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपणार आहे. यातील भाजपच्या कोट्यातून उदयनराजेंची वर्णी लावण्याची मागणी होत आहे.