सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उदयनराजेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
जोरदार शक्ती प्रदर्शनासह उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल - उमेदवारी अर्ज
उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उदयन राजे यांनी राजवाडा (जलमंदिर पॅलेस) येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. ही रॅली पोवई नाक्यावर आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. यानंतर त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल केला.
यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील आणि आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.