महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंडप व्यावसायिकांच्या आंदोलनाला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंचेही पाठबळ - मंडप व्यावसायिकांना उदयनराजेंचा पाठिंबा

लॉकडाऊन काळात मंडप व्यावसायिकांसाठी घालण्यात आलेले निर्णय शिथील करून या मंडप व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी यासह इतर मागण्यांसाठी मंडप डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनच्या आंदोलन केले. त्या आंदोलनाला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंनी पाठिंबा दिला आहे.

manadap contractor news
मंडप व्यावसायिकांच्या आंदोलनाला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंचेही पाठबळ

By

Published : Nov 2, 2020, 7:30 PM IST

Updated : Nov 2, 2020, 7:36 PM IST


सातारा - आर्थिक अडचणीत असलेल्या मंडप, लाईट डेकोरेशन व्यवसायिकांनी केलेल्या धरणे आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला. शासनाने या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी मंडप व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले. या आंदोलनात टेन्ट, मंडप, कॅटरिंग, फोटोग्राफर, मंगल कार्यालय, बॅकेट हॉल, डी.जे. साऊंड, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इ. सेवा देणारे व्यावसायिक सहभागी झाले होते. मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

मंडप व्यावसायिकांच्या आंदोलनाला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंचेही पाठबळ

माणुसकीच्या नात्यातून लवकर योग्य निर्णय घ्यावा-


खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या व्यवसायिकांना पाठिंबा जाहीर केला. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने माणुसकीच्या नात्यातून या व्यावसायिकांच्या बाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. या व्यावसायिकांच्या मागण्या शासनाकडे मांडून त्यांची सोडून करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली. यावेळी असोसिएशनचे राम हादगे, महादेव सूर्यवंशी, रमेश साळुंखे, राजेश भोसले, अशोक भोसले, संदीप गोळे, महेंद्र सोनवले, अमोल शहा आदी उपस्थित होते.

आंदोलनाला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंचा पाठिंबा
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : गृहराज्यमंत्रीगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी भेट देऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंडप, लाईट, फ्लावर डेकोरेटर्स व्यावसायिकांना न्य़ाय देण्यासाठी चर्चा करू. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी या प्रश्नी चर्चा करुन निश्चित मार्ग काढू असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला
Last Updated : Nov 2, 2020, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details