सातारा Udayanraje Bhosale On Sharad Pawar : भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच शरद पवारांच्या निवृत्तीसंदर्भात बोलताना 'राजकारणामध्ये पण रिटायरमेंटचं वय असलंच पाहिजे', असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. शिवाय शरद पवार राज्यात अनेक वेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री राहिलेत. त्यामुळं त्यांनी सल्लागाराची भूमिका बजावावी, असंही ते म्हणालेत.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे :शरद पवारांनी निवृत्त व्हावं असं आपणास वाटतं का? पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देत उदयनराजे म्हणाले की, नाही...पण त्यांनी खरंतर मार्गदर्शक म्हणून भूमिका निभवावी, असं माझं स्पष्ट मत आहे. राजकारणामध्ये पण रिटायरमेंटचं वय असलंच पाहिजे. पवारांनी सल्लागार म्हणून काम करावं. याच भूमिकेत त्यांनी असणं गरजेचं आहे. शरद पवार राज्यात अनेक वेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री राहिलेत. तसंच काही गोष्टींचं ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळत नाही. तर अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. त्यामुळं त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत असणं जास्त गरजेचं असल्याचं उदयनराजे म्हणाले.