महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतासाठी कायपण! उदयनराजे, कदम पोहोचले बांधावर - कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन छत्रपती उदयनराजे आणि धैर्यशील कदम यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला.

शेतकऱ्यंशी संवाद साधताना दोन्ही उमेदवार

By

Published : Oct 16, 2019, 9:20 AM IST

Updated : Oct 16, 2019, 9:35 AM IST

सातारा- मोदींनी दिल्ली जिंकली, आता महाराष्ट्रही जिंकूया, राज्याला समृध्द करायला कमळ-धनुष्य निवडूया, अशा घोषणाबाजीत सातारा, कोरेगाव, खटाव आणि कराड उत्तरमधील 51 गावांमध्ये रॅली काढून लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील कदम यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन छत्रपती उदयनराजे आणि धैर्यशील कदम यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला.


कराड उत्तरच्या विकासासाठी योगदान देणारे दिवंगत बाबासाहेब चोरेकर यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त चोरे येथे धैर्यशील कदम, सत्वशील कदम, वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याचे संचालक यशवंत चव्हाण, राहुल थोरात यांनी चोरेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून आदरांजली वाहिली.

हेही वाचा - लग्नासाठी गड-किल्ले भाड्याने देणे गैर नाही, उलट अर्थव्यवस्थेला फायदा - उदयनराजे भोसले

Last Updated : Oct 16, 2019, 9:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details