महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉल्बी पाहिजेच ओ, पोरं आहेत म्हणल्यावरती तेवढं तर लागणारच - उदयनराजे भोसले

डॉल्बीमुळे जर घरे पडत असती, तर सर्जिकल स्ट्राईक करण्यापेक्षा सीमेवरती डॉल्बीच लावली असती. विमानांची गरजच राहिली नसती, असा टोला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी बंदीच्या निर्णयावर लगावला.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

By

Published : Sep 3, 2019, 9:52 PM IST

सातारा -राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार का? या विषयावर सध्या जोरदार चर्चा साताऱ्यासह राज्यात सुरू आहेत. यातच उदयनराजेंनी गणेशोत्सवातील डॉल्बीविषयी वक्तव्य केले आहे. डॉल्बीला त्यांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले


उदयनराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीबाबत आपली भूमिका मांडली आहे. काही दोन-चार लोक यंत्रणेमध्ये येऊन आपली भूमिका सर्वसामान्यांवर लादत आहेत. डॉल्बी का नको? हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा - गणेश विसर्जनासमोर विघ्न; मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात


सरकार डॉल्बीवाल्यांचे रोजगार काढून घेण्याचे काम करत आहेत. डॉल्बीमुळे जर घरे पडत असती, तर सर्जिकल स्ट्राईक करण्यापेक्षा सीमेवरती डॉल्बीच लावली असती. विमानांची गरजच राहिली नसती, असा टोलाही त्यांनी डॉल्बी बंदीच्या निर्णयावर लगावला. 'डॉल्बी पाहिजेच ओ, पोरं आहेत म्हणल्यावरती तेवढं तर लागणारचं', असे मत त्यांनी आपल्या खास शैलीत व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details