महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक, रामराजेंच्या पुतळ्याचे केले दहन - udyanraje bhosale

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आज रामराजे नाईक निंबाळकर प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

साताऱ्यात रामराजेंच्या पुतळ्याचे दहन

By

Published : Jun 15, 2019, 6:03 PM IST

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आज रामराजे नाईक निंबाळकर प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शुक्रवारी रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली होती.

साताऱ्यात रामराजेंच्या पुतळ्याचे दहन


विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना 'जिल्ह्यातील 3 कुत्री पिसाळली आहेत' असा उल्लेख केला होता. त्यामुळे कालपासून सातारा जिल्ह्यात व माढा लोकसभा मतदारसंघात रामराजे विरोधात वातावरण निर्माण झाले होते. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रामराजे यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत होती. आज दुपारी सातारा येथील पोवई नाक्यावर राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रामराजे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे होळी केली.

राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामराजेंच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. रामराजे सातारच्या छत्रपती घराण्याबद्दल सातत्याने अपशब्द काढत असतात. काही वर्षापूर्वी रामराजेंनी छत्रपती घराण्याची खोड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांचा पुतळा जाळण्यात आला होता. मात्र, भविष्यात अशी आगळीक घडली तर रामराजेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असा इशाराही राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details