सातारा -लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यानन कराडमधील प्रचार सांगता सभेत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेल्या वत्तव्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये संताप होता. निकालानंतर प्रथमच उदयनराजे भोसले गुरूवारी कराड येथे आले होते. पंकज हॉटेलच्या हॉलमध्ये मुस्लीम बांधवांच्या बैठकीत बोलताना उदयनराजेंनी भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मुस्लीम बांधवांची त्यांनी माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावरही टीका केली.
उदयनरोजे म्हणाले, "कराडातील त्या सभेत पावसकरांच्या भाषणावेळी जर मी व्यासपीठावर उपस्थित असतो तर भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचले असते. माफी मागताना सुद्धा मला लाज वाटत आहे. माझ्याकडून कोणताही समाज दुखावला जाईल, असे कृत्य मी केले नाही. ते दुसर्यानं केले असेले तरी मी आपली माफी मागतो. समाजात सौहार्दाचे वातावरण रहावे हीच त्यामागील भावना आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सुरूवातीला माझ्या प्रचारात सहभागी नव्हते. परंतु, सांगता सभेत येऊन त्यांनी माझ्या सर्व कामावर विरजण टाकले. अशा भिकारड्या प्रवृत्तीला ठेचा"