सातारा : मुठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळेच प्राध्यापक आणि शिक्षकांवर आंदोलनाची वेळ येत असल्याचा आरोप करत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) नामोल्लेख टाळून केला आहे. रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक, प्राध्यापकांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील शरद पवारांच्या हस्तक्षेपावर टीका (Udayan Raje Bhosale allegtaions) केली.
Udayan Raje Bhosale Allegtaions : रयत शिक्षण संस्थेतील सत्तेचे केंद्रीकरण - उदयनराजेंचा शरद पवारांवर आरोप - रयत शिक्षण संस्था
खासदार उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झाले आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळून केला (Udayan Raje Bhosale allegtaions on Sharad Pawar) आहे. शिक्षकांच्या आंदोलनाकडे संस्था दुर्लक्ष करत आहे. त्यावेळी त्यांनी शिक्षकांची भेट घेतली, तेव्हा ते बोलत (centralization of power in Rayat Shikshan Sanstha ) होते.
संस्थेच्या उभारणीत वाटा :रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत राजघराण्याचा मोठा वाटा आहे. मात्र, आता रयत संस्थेच्या संचालक मंडळाच्या बाॅडीत योगदान नसणाऱ्यांना सुद्धा घेतले गेले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची घटना तयार करताना संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असे नमूद केले होते. मात्र, काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झाले आहे, असा आरोप उदयनराजेंनी (Udayan Raje Bhosale allegtaions on Sharad Pawar) केला.
आंदोलनाकडे संस्थेचे दुर्लक्ष :गेल्या दहा दिवसांपासून रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर ५० शिक्षक आंदोलन करत आहेत. परंतु, शिक्षकांच्या आंदोलनाकडे संस्था दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिक्षकांची भेट घेतली. संस्थेच्या राजकारणावर भाष्य करत उदयनराजेंनी पुन्हा एकदा शरद पवार आणि पवार कुटुंबीयांनी रयत संस्थेच्या सत्तेचे केंद्रीकरण केल्याचा हल्लाबोल (centralization of power in Rayat Shikshan Sanstha ) केला.