कराड (सातारा)- कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या वनवासमाची (ता. कराड) येथील 24 आणि 75 वर्षीय वृद्ध महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून 56 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कराडमधील दोन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
वनवासमाची (ता. कराड) येथील 24 आणि 75 वर्षीय वृद्ध महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत.
कराडमधील दोन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या कोरोनामुक्त रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.