महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हसवड - माळशिरस रस्त्यावर दुचाकी चारचाकीची समोरासमोर धडक; दोघे गंभीर - अपघात सातारा

राजू तुकाराम हारागावकर (वय 27 रा.परभणी), नितीन रामचंद्र मासाळ (वय 45 रा.म्हसवड) गंभीर जखमी झाले आहेत.

accident
अपघात

By

Published : Feb 7, 2020, 6:30 PM IST

सातारा- माण तालुक्यातील म्हसवड - माळशिरस रस्त्यावर कोडलकरवस्ती येथे चारचाकी (टाटा एस) व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये राजू तुकाराम हारागावकर (वय 27 रा.परभणी), नितीन रामचंद्र मासाळ (वय 45 रा.म्हसवड) गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा -खून का बदला खून? राष्ट्रवादी नेत्याच्या हत्ये प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह तिघांना अटक

याबद्दल अधिक माहिती अशी की, म्हसवडकडून माळशिरसकडे दुचाकीवरून परभणी येथील युवक निघाले होते. यावेळी दुचाकी गाडी व चारचाकी गाडी म्हसवड कडे येत असताना हा अपघात घडला. यामध्ये दुचाकीवरील राजू तुकाराम हारागावकर गंभीर जखमी झाला तर, टाटा एस गाडीचा चालक नितीन रामचंद्र मासाळ हादेखील जखमी झाला आहे. ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीवरील राजू हरगावकर हा चारचाकीच्या गाडीची काच फोडून आत गेला होता. राजू हरगावकर यास अकलूज येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर, नितीन मासाळ यास म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details