कराड (सातारा)- कोविड वॉर्डमध्ये काम करणार्या परिचारिकेकडून चोरीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. 19 मे रोजी मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली होती. कोविड वॉर्डमधील मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने छडा लावण्यात यश मिळविले आहे. याप्रकरणी कोविड वॉर्डमध्ये काम करणार्या परिचारिकेकडून चोरीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. 19 मे रोजी मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली होती.
दोन तोळ्याचे मंगळसूत्र गेले होते चोरीला
कराडमधील एका हॉस्पिटलमध्ये कोरोनबाधित महिला उपचार घेत होती. उपचारादरम्यान महिलेचे 65 हजार रूपये किंमतीचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. याप्रकरणी संबंधित महिलेने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 18 मे रोजी हॉस्पिटलमधून मंगळसूत्र चोरीला गेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना कोरोना वॉर्डमधील महिला परिचारिकेने मंगळसूत्र चोरी केल्याचा प्रकार समोर आला. संबंधित परिचारिकेकडून मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, मारूती लाटणे, विनोद माने, आनंदा जाधव, प्रफुल्ल गाडे यांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मंगळसूत्र चोरीचा गुन्हा उघडकीस आणणार्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अभिनंदन केले.
हेही वाचा- मंदिरात चोरी केल्यावर 'त्याने' घेतले देवीचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल