महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॉलिशच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी कराडमधील वृद्धेचे साडे पाच तोळ्याचे दागिने केले लंपास

कराडमध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी भरदिवसा कराडच्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील एका वृद्धेचे साडे पाच तोळ्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

two-thieves-stole-jewelry-in-karad
पॉलिशच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी कराडमधील वृद्धेचे साडे पाच तोळ्याचे दागिने केले लंपास

By

Published : Jan 31, 2020, 5:17 PM IST

सातारा -दोन अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी भरदिवसा कराडच्या शिवाजी हाउसिंग सोसायटीतील एका वृद्धेचे साडे पाच तोळ्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले. दागिने पॉलिश करून देण्याचा बहाण्याने भामट्यांनी आपला डाव साधला. या प्रकरणी अंजली पाटील (वय,75) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अंजली पाटील किचनमध्ये असताना दोन व्यक्ती त्यांच्या घराबाहेर आल्या. आमच्याकडे तांबे व पितळेची भांडी स्वच्छ करण्याची पावडर आहे. तुमच्या घरातील भांडी स्वच्छ करून देऊ, असे दोघांनी त्यांना सांगितले. म्हणून त्यांनी घरातील तांब्याची भांडी व देवाची चांदीची मूर्ती दिली. त्यांनी ती भांडी व मूर्ती स्वच्छ करून दिली. त्यानंतर सोन्याचे दागिनेही पॉलिशच करून देण्याचा बहाणा केला.

अंजली पाटील यांनी एक तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, दीड तोळ्याची सोनसाखळी पावडरच्या डब्यात ठेवली. तो डबा गॅसवर ठेवून पाणी गरम करा, सोन्याचे दागिने आपोआप स्वच्छ होतील, असे सांगून दोन्ही भामटे तेथून पसार झाले.

काही वेळाने अंजली पाटील यांनी डबा उघडून पाहिला असता डब्यात सोन्याच्या बांगड्या, माळ नव्हती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात जाऊन दोन अज्ञात भामट्यांविरोधात फिर्याद दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details