सातारा -कासवाची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्या दोघांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. या तस्करीमागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. मंजुष शिवाजी जगताप (वय १९, रा. रामनगर, मुळ रा.शहापूर, उस्मानाबाद) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे. यातील एकजण अल्पवयीन आहे.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दोन युवक शाहूपुरी चौकामध्ये पिशवीत काहीतरी घेवून संशयीरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने शाहूपुरी चौकात सापळा लावून दोन तरुणांना पकडले. त्यांची चौकशी केली असता पिशवीत जिवंत कासव आढळले. आरोपी जगतापबरोबर एका अल्पवयीन मुलाचा या गुन्ह्यात सहभाग आहे. त्यांनी हे कासव विक्रीसाठी आणले होते. 'इंडियन सॉफ्ट शेल' जातीचे हे कासव आहे. त्याची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात मोठी किंमत असल्याचे, पोलिसांनी सांगितले.