महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विलगीकरणातील 2 पुरुषांसह कोरोना केअर सेंटरमधील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - 3 नवीन कोरोना रुग्ण सातारा

आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या- 128 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधित रुग्णांची संख्या 65 आहे. तर, कोरोनामुक्त होवून घरी गेलेले रुग्ण 61 असून कोरोनाबाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

satara corona
satara corona

By

Published : May 16, 2020, 8:52 AM IST

सातारा- येथील कोरोनाबाधितांचे निकट सहवासीत म्हणून विलगीकरणात दाखल असलेले दोघे आणि मुंबईवरून प्रवास करून आलेला कोरेगाव तालुक्यातील एक युवक अशा तिघांचे अहवाल हे कारोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा येथील कोरोनाबाधितांचे निकट सहवासीत म्हणून 40 आणि 47 वर्षांचे दोघे विलगीकरणात दाखल आहेत. मुंबईवरून प्रवास करून आलेला कोरेगाव तालुक्यातील एक 29 वर्षीय युवक 11 तारखेपासून कोरोना केअर सेंटरमध्ये होता. विनापरवानगी मुंबई येथून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या- 128 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधित रुग्णांची संख्या 65 आहे. तर, कोरोनामुक्त होवून घरी गेलेले रुग्ण 61 असून कोरोनाबाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details