सातारा - कराडजवळच्या मलकापूरमधील आगाशिवनगर उपनगरात झालेल्या विकी लाखे खून प्रकरणातील दोन संशयितांकडून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन बंदूक आणि कार जप्त केली आहे. पत्त्याचा क्लब चालविणार्या विकी लाखे याचा एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणावरून ६ नोव्हेंबरच्या रात्री गोळ्या घालून खून करण्यात आला होता.
हेही वाचा -अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला; आरोपी फरार
या गुन्ह्यात तब्बल ४२ दिवसांनी अर्जुन पोळ आणि त्याचा भाचा अमित कदम या दोन संशयितांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रटीकरण शाखेने अटक केली. ज्या बंदूकीतून विकी लाखेवर गोळ्या झाडण्यात आल्या, त्या दोन्ही बंदूक आणि खून केल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करून संशयितांना पकडले आहे. त्यामुळे तपास पथकाला बक्षिस मिळावे यासाठी शिफारस करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा -प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह सापडलेल्या 'त्या' मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, हवालदार राजेंद्र थोरात, नितीन येळवे, विवेक गोवारकर, सतीश जाधव, राजेंद्र पुजारी, सचिन साळुंखे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, मारूती लाटणे, विनोद माने, आनंदा जाधव यांच्या पथकाने संशयीतांना शिताफीने पकडत या प्रकरणाचा छडा लावला आहे.