सातारा - आपसातील वाद मिटवण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गेलेल्या दोघांनी एकमेकांवर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात एकच थरकाप उडाला. संबंधित घटनेतील दोघांनाही गंभीर दुखापत झाली. यानंतर एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरी व्यक्ती अत्यवस्थ आहे.
साताऱ्यात पोलीस ठाण्याच्या आवारातच एकमेकांवर वार; एकाचा मृत्यू - क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालय
आपसातील वाद मिटवण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गेलेल्या दोघांनी एकमेकांवर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात एकच थरकाप उडाला.
सातारा तालुक्यातील सैदापूरमध्ये सुरेश दुबळे आणि रामा दुबळे हे दोघे वास्तव्यास आहेत. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्याचवेळी सुरेश दुबळे याने एका धारदार शस्त्राने रामा दुवळेवर पहिला वार केला. यानंतर त्याच हत्याराने रामाने सुरेशवर हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. थेट पोलीस ठाण्याच्या आवारात हल्ला झाल्याने पोलिसांची धावाधाव झाली. दोघांनाही क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सुरेश दुबळेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.