सातारा - कराड येथील कृष्णा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या पाच महिन्यांच्या बाळाचा आज मृत्यू झाला. तीव्र जंतुसंसर्गामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तीव्र जंतू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या महिला आणि तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू, 'त्या' दोन्ही मृतांचे अहवाल निगेटिव्ह - satara corona news
कराड येथील कृष्णा रुग्णालयात तीव्र जंतू संसर्गामुळे ४ बाधित रुग्णांचे निकट सहवासित म्हणून २४ आणि कराड उपजिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णाचा १ निकट सहवासित अशा एकूण ४१ जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कराड येथील कृष्णा रुग्णालयात तीव्र जंतू संसर्गामुळे ४, बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून २४ आणि कराड उपजिल्हा जिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णाचा १ निकट सहवासित अशा एकूण ४१ जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
आज दाखल करण्यात आलेल्या अनुमानितांमध्ये ५ महिन्यांच्या बाळाचा समावेश होता. मात्र, दुपारी त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तीव्र जंतू संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तीव्र जंतू संसर्गामुळे ७० वर्षांच्या वृद्धेचा आणि ३२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.